मीराबाई चानू ऐवजी भलत्याच खेळाडूला शुभेच्छा दिल्या, बॉलिवूड अभिनेत्री ट्रोल

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी हिंदुस्थानच्या खात्याची रुपेरी सुरुवात झाली. मीराबाई चानू हिने 49 किलो वजनीगटात वेटलिफ्टिंग या खेळात रौप्य पदक पटकावलं. अवघ्या देश तिच्या या आनंदात सहभागी झाला. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी तिचं या यशासाठी अभिनंदन केलं. पण, या सेलिब्रिटींमधील एक अभिनेत्रीने मात्र एक चूक केली आणि तिला ट्रोल व्हावं लागलं.

तारे जमीन पर या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली टिस्का चोप्रा हिनेही मीराबाई हिच्या कामगिरीवर तिचं अभिनंदन करणारी एक पोस्ट टाकली. पण, तिला शुभेच्छा देण्याच्या नादात तिच्याकडून एक चूक झाली.

तिने मीराबाई हिच्या फोटो ऐवजी इंडोनेशियाची वेटलिफ्टर ऐशा सान्टिका हिचा फोटो शेअर केला. त्याच्याखाली कॅप्शन देत मीराबाई हिचं अभिनंदनही केलं. मात्र, नेटकऱ्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.

tisca-chopra-tweet

त्यांनी टिस्काला ट्रोल करायला सुरुवात केली. फक्त शिष्टाचार म्हणून फोटो शेअर करू नकोस, नीट माहिती करून घेत जा. बॉलिवूडकर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काहीही पोस्ट करतात, अशा अर्थाचे अनेक ट्वीट्स तिच्या ट्वीटखाली शेअर केले गेले.

त्यावर टिस्कानेही माफी मागितली आणि ट्रोलर्सना उत्तरही दिलं. माझ्याकडून फोटो शेअर करण्यात चूक झाली म्हणजे मी तिचा आदर करत नाही, असा होत नाही, असंही तिने ट्रोलर्सना सुनावलं.

आपली प्रतिक्रिया द्या