दम्याचा अॅटॅक आल्याने खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात

737

तृणमूल काँग्रेसची खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहाँ हिला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी कोलकात्यातील अपोलो रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. रुग्णालयात असल्याने नुसरतला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत हजर राहता आले नाही.

नुसरत जहाँ हिला दम्याचा त्रास असून तिला दम्याचा अॅटॅक आल्याचे समजते. शनिवारी नुसरतचा पती निखील जैन याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये अचानक नुसरतला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तिला अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. सध्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. नुसरतला दम्याचा त्रास असून याआधीही तिला दम्याचा अॅटॅक आल्याचे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या