आज 45 वर्षे व ज्येष्ठांना दुसरा डोस  

मुंबईतील पालिका आणि राज्य सरकारच्या लसीकरण केंद्रांवर उद्या मंगळवार, 4 मे रोजी 45 वर्षे व ज्येष्ठांना फक्त दुसरा डोस देण्यात येणार आहे. कोविन अॅपमध्ये नोंदणी केलेल्या व थेट येणाऱ्यांना (वॉक इन) नागरिकांनाही यात लस देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. मुंबईत तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण सुरू असून पालिकेच्या 5 लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 500 व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस केवळ ‘कोविन अॅप’मध्ये नोंदणी केलेल्या, लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेली आहे, अशा व्यक्तींना देण्यात येणार आहे. इथे लसीकरण सुरू राहणार ः 1) नायर रुग्णालय (मुंबई सेंट्रल), 2) राजावाडी (घाटकोपर), 3) कूपर रुग्णालय (जुहू-विलेपार्ले), 4) सेव्हन हिल्स (अंधेरी), 5) बीकेसी जम्बो कोरोना केंद्र

आपली प्रतिक्रिया द्या