कुर्ल्यात शौचालयाची भिंत कोसळून महिला ठार

कुर्ला पश्चिम येथील नवपाडा बॉम्बे उत्कल समितीजवळ, नाज हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक शौचालयाची भिंत सोमवारी सकाळी पावणे आठच्या सुमाराला कोसळली. त्याखाली एक महिला अडकून पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिची सुटका करत तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. द्रौपदी रावले (55) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या