Tokyo olympic – बलाढ्य अर्जेंटीनाविरुद्ध हिंदुस्थानी संघाचा जबरदस्त विजय

टोकयो ऑलिम्पिकच्या सहाव्या दिवशी हिंदुस्थानी संघाने जबरदस्त कामगिरी करत बलाढ्य अर्जेंटीनाला 3-1 ने हरवले आहे. हिंदुस्थानकडून वरुण कुमार, विवेक सागर प्रसाद, हरमनप्रीत सिंह यांनी गोल केले आहेत. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

अर्जेंटिना विरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघ एकमेकांना काँटे की टक्कर देत होते. पहिल्या सत्राचा खेळ संपेपर्यंत दोन्ही संघाचे शून्य गोल होते. तिसऱ्या क्वार्टरतच्या 43 व्या मिनिटाला हिंदुस्थानला पेनेल्टी कॉर्नरची संधी मिळाली व वरुण कुमारने मिळालेल्या संधीचे सोने केले. तिसरा क्वार्टर संपेपर्यंत हिंदुस्थान 1-0 ने आघाडीवर होता.

मात्र टीम इंडियाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. त्यानंतर पाचच मिनिटांत अर्जेंटीनाने गोल करून सामन्यात बरोबरी केली. मायको कॅसेला याने हा गोल केला. त्यानंतर मात्र हिंदुस्थानने पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स देत दोन गोल केले. विवेक सागर प्रसाद आणि हरमनप्रीत सिंह यांनी हे गोल केले.

आपली प्रतिक्रिया द्या