टोकियो ऑलिम्पिकमधून मनु भाकर आणि सौरभ चौधरीची जोडी बाहेर

टोकियो ऑलिम्पिकच्या पाचव्या दिवशी हिंदुस्थानचे नेमबाज स्पर्धेबाहेर गेले आहेत. मनु भाकर आणि सौरभ चौधरी यांची जोडी मेडल राऊंडमधून बाहेर गेली आहे.

या जोडीची सुरुवात चांगली झाली होती. या दोघांनीही 10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीमच्या क्वॉलिफिकेशन राऊंडचा पहिला टप्पा पार केला होता आणि ते दुसऱ्या टप्प्यात पोहोचले होते. पण, इथे मात्र त्यांची खेळाची कमाल फिकी पडली आणि हे दोघंही मेडल राऊंडमधून बाहेर गेले.

सौरभने पहिल्या टप्प्यात 296 तर मनुने 286 गुणांची कमाई केली होती. सर्वोत्तम आठ टीम्स क्वालिफिकेशनच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या. प्रत्येक नेमबाजाला दोन सीरीजमध्ये 10 वेळा नेम लावण्याची संधी मिळाली.

दुसऱ्या टप्प्यात नेम लावण्याच्या दोन्ही सीरीजमध्ये अनुक्रमे 92 आणि 94 असे एकूण 186 गुण मिळवले. तर सौरभने अनुक्रमे 96 आणि 98 असे 194 गुण पटकावले. एकूण चार सीरीजमध्ये या जोडीला फक्त 380 गुण मिळवता आले.

त्यांच्या सोबतच्या दोन संघांनी ही फेरी पूर्ण केली. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या टीम्स कांस्यपदकासाठी लढणार आहेत.

पहिल्या टप्प्यात मनु आणि सौरभच्या जोडीने सातवा क्रमांक पटकावला. मेडल राउंडमध्ये चारच संघ निवडले जातात. या चार संघांमध्ये मनु आणि सौरभचा समावेश होऊ शकला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या