#TokyoOlympics – उद्या हिंदुस्थानच्या खात्यात जमा होऊ शकतात 4 पदके, जाणून घ्या कसं…

टोकियो ऑलिम्पिकचा 12 वा दिवस हिंदुस्थानसाठी संमिश्र होता. हिंदुस्थानी मुष्टीयोद्धा लवलिना बोरगोहेनने कांस्यपदक जिंकले आहे. तर रवी दहियाने अंतिम फेरी गाठत आपले रौप्य पदक निश्चित केले आहे. यासोबतच भालाफेकमध्ये नीरज चोप्राने अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. असे असले तरी दीपक पुनिया आणि महिला हॉकी संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

टोकियो ऑलिम्पिकच्या 13 वा दिवस हिंदुस्थानसाठी सुवर्ण दिवस ठरू शकतो. बुधवारी हिंदुस्थानच्या खात्यात 4 पदके जमा होऊ शकतात. 5 ऑगस्ट रोजी रवी दहियाची नजर सुवर्णपदकावर असेल. तर दीपक पुनिया आणि पुरुष हॉकी संघ कांस्यपदकासाठी लढतील. तसेच पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागलेल्या हिंदुस्थानी महिला कुस्तीपटू अंशू मलिकला रेपेचेज फेरीत कास्यपदक जिंकण्याची संधी मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या