अहोआश्चर्य! चक्क नाकात आले दात

808

दुधाचे दात पडणे नवीन दात येणे, किंवा तरुण वयात अक्कलदाढ येणे हा मानवी जीवनातील दातांचा प्रवास आहे. तो साऱ्यांनी अनुभवलाच असेल. पण कधी कोणाच्या नाकात दात आलेला पाहिलं किंवा ऐकलं आहे का? कदाचित हा प्रश्न वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. परंतु चीनमध्ये अशी घटना घडली आहे.

श्वास घेण्यास त्रास होत आहे अशी तक्रार घेऊन आलेल्या रुग्णाची चाचणी केल्यानंतर असे निर्देशनास आले की त्या रुग्णाच्या नाकात दात आला आहे.

तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्याने या झांग बिन्शेंग यांनी विविध तपासण्या करून घेतल्या. मात्र तरीही कारण सापडेना. अखेर झांग बिन्शेंग यांनी बड्या डॉक्टरकडून वैद्यकीय उपचार घेण्याचे ठरवले आणि त्याकरता रुग्णालयात दाखल झाले. श्वास घेताना नेमके काय अडथळा येत आहे याचे परिक्षण करण्यासाठी डॉक्टरांनी नाकाचे एक्स-रे काढले. या एक्स-रे च्या रिपोर्टनुसार रुग्णाच्या नाकाच्या आतील बाजूस काहीशी सूज आल्यासारखे दिसले. नाकाचं हाड वाढलं असावं असा पहिला अंदाज होता, मात्र अधिक तपासणी केली असता या रुग्णाच्या नाकात दाताची वाढ होत असल्याचे डॉक्टरांना आढळले.

त्यानंतर त्यांनी झांग बिन्शेंग यांची मेडिकल हिस्ट्री (आधी झालेले आजार, वैद्यकीय उपचार) विचारली. तेव्हा याचे कारण सापडले. वयाच्या दहाव्या वर्षी झांग बिन्शेंग एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते आणि या अपघातात झागं बिन्शेंग यांच्या तोडांवर जबर मार बसला होता. दाताला खोलवर इजा झाली होती आणि दाताची मुळं नाकात वाढत गेली.

चीनमधील हर्बिनड येथील हार्बिन मेडिकल युनिव्हर्सिटी रुग्णालयातील डॉ. गुओ लाँगमेई हे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ’30 मिनिटांची शस्त्रक्रिया करून हे दात काढण्यात आले आहे. आत झांग बिन्शेंग यांची प्रकृती उत्तम आणि काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही’.

आपली प्रतिक्रिया द्या