रायगडातील धबधब्यांवर जाण्यास पर्यटकांना दोन महिने बंदी

सामना प्रतिनिधी । अलिबाग

पावसाळा सुरू झाला की पावसाळी पर्यटनाला ऊत येत असतो. जिह्यात पावसाळी पर्यटनाला मोठय़ा प्रमाणात वाव असल्याने नैसर्गिक धबधब्यावर पर्यटक गर्दी करीत असतात. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झेनिथ धबधबा, आडोशी धबधबा, आडोशी पाझर तलाव या पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांसाठी ५ जुलै ते ४ सप्टेंबर २०१८ पर्यंत वैशाली परदेशी, उपविभागीय अधिकारी, कर्जत यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.