विविध स्पर्धांमध्ये गाजलेली ट्रॅजेडी शॉर्ट फिल्म युट्यूबवर रिलीज

1162

महिलांची सुरक्षा, नातेसंबंधांतील विश्वास, मैत्री यावर आधारित ट्रॅजेडी ही शॉर्टफिल्म स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर रिलीज झाली. अक्षय हडकर व कोमल अहिरे या दोघांची मुख्य भूमिका असलेल्या या शॉर्टफिल्मने विविध स्पर्धांमध्ये नाव कमावले आहे. या शॉर्टफिल्मला दादासाहेब फाळके गोल्डन अवॉर्ड्समध्ये नामांकन देखील मिळालं होतं. प्रिशू फिल्म्स या युट्यूब चॅनेलवर ही शॉर्ट फिल्म रिलीज करण्यात आली आहे.

दादर, प्रभादेवी, नालासोपारा येथे राहणाऱ्या काही तरुणांनी मिळून ही शॉर्टफिल्म तयार केली आहे. ट्रॅजेडीची मूळ कल्पना ही शुभम कांबळे यांची आहे. लेखन ओमकार झगडे यांनी केेल आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शुभम कांबळेचे असून याला चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत “गिरगांवकर गोडबोले” म्हणजेच पुष्कर गोडबोले. तेजस पडावेने चित्रपटाला संगीत दिले आहे तर शुभम गायकवाड प्रोडक्शन हेड आहे.

सामान्य कुटुंबातील मुलगा व मुलगी, त्यांच्यातील प्रेमातील यावर या चित्रपटाची कथा आहे. अक्षय हडकर, कोमल अहिरे, अमेय एडवणकर, प्रियंका काळे, सागर जाधव, सचिन जाधव, काजल जाधव, अक्षय पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. या शॉर्ट फिल्मला अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाली आहेत. विशेष म्हणजे ही शॉर्ट फिल्म बनविणाऱ्या शुभम कांबळे यांनी फिल्म मेकिंगचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. आवड असल्याने त्यांनी युट्युबवर बघून ही शॉर्ट फिल्म केली आहे.

‘घरची परिस्थिती बेताची असल्याने मी फिल्म मेकिंगचा कोर्स करू शकलो नाही. त्यामुळे मी युट्यूबवरव्हिडीओ पाहून फिल्म मेकिंगचे धडे घेतले. काहीतरी करायचंचं अशी जिद्द होती. मला या माझ्या चित्रपटातात माझा मित्र शुभम गायकवाडची खूप मदत झाली. या चित्रपटाचे शूटींग आम्ही एखाद्या सोसायटीमध्ये, रस्त्यावर, शिवाजी पार्कमध्ये केले आहे. ऑडिशन घेण्यासाठी ऑफिस नसल्याने मी रेल्वे स्थानकात वगैरे कलाकारांना भेटलो आहे. असंच खूप प्रयत्नानंतर आमचा ट्रॅजेडी सिनेमा तयार झाला,’, असे दिग्दर्शक शुभम कांबळे यांनी सांगितले

शॉर्ट फिल्मची लिंक – https://youtu.be/-0O2h0iNJGQ

आपली प्रतिक्रिया द्या