
स्पॅम कॉल्स आणि अनावश्यक मेसेजला थांबवण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने डिजिटल संमती व्यवस्थापन योजनेची पायलट मोहीम सुरू केली आहे. यासाठी ट्रायने पुढाकार घेत आरबीआयची मदत घेतली आहे. डीएनडीची नोंदणी असूनही काही ग्राहकांना अशा प्रकारचे मेसेज व कॉल येत आहेत. या कंपन्यांनी मोबाईल नंबर चुकीच्या पद्धतीने मिळवलेले असते. बँकिंग व्यवहारांचे संवेदनशील स्वरूप आणि फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात घेता, या पायलट योजनेची अंमलबजावणी प्रथम बँकिंग क्षेत्रात करण्यात येत आहे.