आयुष्मान खुरानाची आई गर्भवती, सगळे म्हणताहेत ‘बधाई हो’!

28

सामना ऑनलाईन । मुंबई

मथळा वाचून चांगलाच धक्का बसला असेल ना.. पण हो ही बातमी खरी आहे. फक्त ही आयुष्मानची खरीखुरी आई नसून त्याच्या आगामी ‘बधाई हो’ या चित्रपटातली आईची व्यक्तिरेखा आहे. एका तरुणाची मध्यमवयीन आई गर्भवती झाल्याने उडणारा गोंधळ सांगणाऱ्या ‘बधाई हो’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या आईची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी केली आहे. आई गर्भवती झाल्यामुळे जो काही गोंधळ उडू शकतो, तो या ट्रेलरमधून धम्माल पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘वय वर्षे ५५’ या मराठी नाटकासारखी दिसतेय. पण नक्की काय विषय आहे ते प्रत्यक्ष चित्रपटातच कळेल.

या चित्रपटात आयुष्मानसह सानिया मल्होत्रा, नीना गुप्ता, सुरेखा सिक्री यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. अमित शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट १९ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा चित्रपटाचा ट्रेलर-

summary- trailer-of-badhaai-ho-has-released

आपली प्रतिक्रिया द्या