घोळ ‘बेबी’ घोळ! पाहा ‘गुड न्यूज’चा धमाल ट्रेलर

634

नैसर्गिकरित्या आई-वडील होऊ न शकणाऱ्या जोडप्यांसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान एक वरदान ठरत आहे. पण, शेवटी माणसाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानात त्याच्याच चुकीमुळे घोळ होऊ शकतात. जर तसं झालं तर काय गहजब होईल, याची कथा सांगणाऱ्या गुड न्यूज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

समान आडनावाची दोन जोडपी एकाच सेंटरमध्ये आयव्हीएफ उपचार घ्यायला जातात. डॉक्टरांच्या चुकीने एक घोळ होतो आणि मुलाच्या जैविक पित्यावरून गोंधळ माजतो. तो गोंधळ नेमका कशाने होतो आणि त्याचं परिणती कशात होते, ते चित्रपटातून कळणार आहे. पण, हा ट्रेलर अतिशय धमाल असल्याने प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे.

अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांज आणि कियारा आडवाणी हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला हा चित्रपट राज मेहता यांनी दिग्दर्शित केला असून येत्या 27 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या