बेळगावमधून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बेळगाव

बेळगावच्या मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमधून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता झाला आहे. करीमुल्ला मेहबूबबाशा शेख (19) असं या जवानाचे नाव असून, तो आंध्रप्रदेशातल्या पमळपाडू येथील रहिवाशी आहे. या प्रकरणी शुक्रवारी कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

करीमुल्ला मंगळवारी पहाटे 4.50 वाजण्याच्या सुमारास कोणालाही न सांगता सेंटरमधुन निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. रेजिमेंटल सेंटरमधील अधिकाऱ्यांना करीमुल्ला बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांनी परिसरात शोध घेतला मात्र, तो कुठेही सापडला नाही.

दरम्यान, या प्रकरणी मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमधील अधिकाऱ्यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. बेपत्ता करीमुल्ला याची उंची176 सेंमी असून त्याने अंगावर खाकी रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. तसेच, त्याला हिंदी, तमिळ, तेलगू भाषा अवगत आहेत. वरील वर्णनातील व्यक्तीबद्दल कोणाला अधिक माहिती मिळाल्यास त्यांनी कॅम्प पोलीस ठाण्याशी सम्पर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.