कर्नाटकमध्ये विमान कोसळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारामती विमान अपघाताची दुर्घटना ताजी असतानाच कर्नाटकातील विजयपुरा येथे आज एका खासगी प्रशिक्षणार्थी विमानाला भयंकर अपघात झाला. शेतात कोसळलेल्या या विमानाचा पुढील बाजूने अक्षरशः चुराडा झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त विमान कलबुर्गीहून बेळगावला चालले होते. अपघातावेळी विमानात पायलटसह दोघे होते.