
देशातील अग्निवीर जवानांच्या पहिल्या बॅचचे सैनिकी प्रशिक्षण नगर येथील आर्म्ड कोअर सेंटर ऍण्ड स्कूलमध्ये (एसीसी ऍण्ड एस) सुरू झाले आहे. सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण येथे या जवानांना मिळणार आहे.
अग्निवीर योजनेंतर्गत नुकत्याच भरती झालेल्या युवकांना हिंदुस्थानी सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. सुशिक्षित तरुणांना अग्निवीर म्हणून सैन्यात भरती केले जात आहे. या केंद्रातून प्रशिक्षण घेणाऱया अग्निवीरांना हिंदुस्थानी सैन्यात तोफा चालविणारा गनर, तांत्रिक सहायक (टेक्निकल असिस्टंट), रेडिओ ऑपरेटर, मोटार ड्रायव्हर या चार महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. यासाठी मूलभूत शास्त्र्ाशुद्ध सैनिकी प्रशिक्षण हे केंद्रातील प्रशिक्षकांकडून दिले जात आहे. त्यामध्ये 10 आठवडय़ांचे प्राथमिक सैनिकी प्रशिक्षण आणि 21 आठवडय़ांचे ऍडव्हान्स सैनिकी प्रशिक्षणाचा समावेश आहे.


























































