ट्रान्सफॉर्मर चोराने वीज पळवली

417
प्रातिनिधिक फोटो

चोरटय़ाने अख्खा ट्रान्सफॉर्मरच चोरून नेल्याने विरारमधील बावखल गावात गेल्या तीन दिवसांपासून अंधार पसरला आहे. शंभर घरांची वस्ती असलेल्या या गावात ब्लॅकआऊट झाल्यामुळे लहान मुलांसह महिला, वृद्धांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे महावितरण अधिकारी नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी चालढकल करत असल्याने अजून किती दिवस अंधारात राहायचे, असा सवाल गावकरी करत आहेत.

विरार पूर्व कण्हेर पोलीस चौकी हद्दीत बाकखल हे गाव आहे. जवळपास 100 हून अधिक कुटुंबे या गावात वास्तक्यास आहेत. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरटय़ांनी गावातील एकमेक ट्रान्सफॉर्मरची नासधूस करून त्यातील वस्तू लंपास केल्या. त्यामुळे या गावातील वीज गेल्या तीन दिवसांपासून गायब आहे. वीज नसल्याने शंभर घरांमध्ये ब्लॅकआऊट पसरला असून दैनंदिन कामे खोळंबली आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱयांना गेल्या तीन दिवसांपासून या गावातील रहिवाशी संपर्क साधत आहेत. मात्र अधिकारी फोनही घेत नसल्याने ग्रामस्थांच्या संतापात भर पडली आहे.

रहिवाशांमध्ये संताप

महावितरणच्या अधिकारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची कोणतीच हालचाल करत नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे केवळ आश्वासन मिळत आहे, मात्र प्रत्यक्षात कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या