नगर दौड रोडवर बाबुर्डी बेंद फाटा येथे एक ट्रॅव्हल्स बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात काही प्रवासी मृत झाली असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे स्थानिक ग्रामस्थांनी व पोलिसांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले आहे.
भाऊसाहेब दगडू येवले रा बाबुर्डी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे, तर अन्य एकाची ओळख पटलेली नाही. नगर दौंड महामार्गावर बाबुर्डी पेंट फाटा या ठिकाणी एक मोटर सायकल ही गावाच्या दिशेने जात होती ती अचानकपणे समोर आल्यामुळे तिला वाचवण्यासाठी ट्रॅव्हल चालकाने प्रयत्न केला व त्यातच ट्रॅव्हलची गाडी ही रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूचे नागरिक तात्काळ त्या बाजूने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच मदतकार्य सुरू केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले यांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ते सुद्धा या घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी व इतर ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केलेल्या आहे या अपघातामध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे