औराद शहाजनीतील बोगस वृक्षारोपणाच्या चौकशीचे आदेश

322

औराद शहाजानी येथील वृक्षारोपणाचा उडाला फज्जा उडाल्याचे उघड झाल्यानंतर निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी कृषी विस्तार अधिकाऱ्यांतर्फे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मागील वर्षी फडणवीस सरकारने पंचायत विभागाला देण्यात आलेले वृक्षारोपणाच्या उद्दिष्टानुसार निलंगा पंचायत समितीने प्रत्येक ग्रामपंचायतीस उद्दीष्ट देऊन वृक्षारोपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण औराद शहाजानीच्या ग्राम पंचायतीने तत्कालीन जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर यांच्याहस्ते वृक्षारोपण केले होते व बाकी रोपटे दलीत स्मशानभूमीत नेऊन नंतर लावणार होते. त्यासाठी साफसफाई करुन खड्डे ही तयार करण्यात आले होते. पण ते रोपटे तसेच पडून राहील्याने वाळुन गेले. ग्राम पंचायत वृक्षारोपणासाठी हजारो रुपये खर्च कले होते. ही वृत्त उघड होताच विस्ताराधिकारी कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती निलंगा यांचेमार्फत तत्काळ चौकशी करण्याचे व त्याचा अहवाल देण्याचे आदेश दिल्यामुळे ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी धसका घेतल्याची चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या