
रांगोळी काढणे एक मोठा टास्क असतो. त्यासाठी वेळ आणि संयम लागतो. पण पाऊस पडला की, या सगळय़ा मेहनतीवर पाणी फेरले जाते. सोशल मीडियावर एका नवऱ्याने आपल्या पत्नीची मेहनत वाया जाऊ न देण्यासाठी एक जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. दिवाळीदरम्यान शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलेने दारात काढलेली सुंदर, आकर्षक रांगोळी पावसापासून वाचवण्यासाठी नवरा मदतीला धावला. नवऱ्याने खिळे, दोरी आणि बाईकच्या मदतीने रांगोळीवर प्लॅस्टिकचे आच्छादन उभारले आहे. ते पाहून बायको खूश झाली आणि तिने याचा व्हिडीओ शूट करून @shraddhuu1007 आणि @shubh_24.04 इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अवघ्या काही तासांतच व्हायरल झाला.



























































