
इटलीच्या तरुणी आपल्या खास अंदाजात ‘वाजले की बारा’ हे मराठी गाणे गात असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यांच्या सादरीकरणाने नेटिजन्सची मने जिंकली आहेत. इटालियन तरुणींचे मराठीचे उच्चार स्पष्ट नसले तरी त्यांचा भाव, हावभाव, गाण्याची लय आणि त्यांनी साधलेला समतोल लक्ष वेधून घेतोय. मराठी गीताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळणारा प्रतिसाद बघून नेटकऱयांनी आनंद व्यक्त केला. तिन्ही तरुणींचे तोंडभरून कौतुक होत आहे. महाराष्ट्राची संस्कृती आता जागतिक बनेतय, अशा प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहे. ‘अभिमान मराठी’ अशा प्रतिक्रियादेखील येत आहेत. खरेच या तरुणींनी मराठी गाणे म्हटलेय का? याबद्दल काहींनी साशंकता देखील व्यक्त केली आहे.