ट्रेंड – एक दुचाकी, सहा सवारी

वाहतुकीचे नियम मोडले की, वाहतूक पोलीस कारवाई करणारच. पण, अनेकदा वाहनचालक अशा प्रकारे नियम मोडतात की, पोलीसदेखील त्यांच्यासमोर हात जोडतात. सोशल मीडियावर एक वाहनचालकाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यात एक जण तब्बल 6 मुलांना बसवून मोटरसायकल चालवीत होता. उत्तर प्रदेशातील हापूर येथील हा फोटो असल्याचे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. चार मुले चालकाच्या मागे, तर 2 मुले समोर पेट्रोलच्या टाकीवर बसलेले दिसतात. वाहतूक पोलिसाने त्याला थांबविले आणि हात जोडून त्याला गांभीर्य समजविले. त्यासोबतच त्याला 7 हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला. ‘एक्स’ या सोशल मीडियावरील @bstvlive या खात्यावरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.