ट्रेंड – इन्स्टावर खी-खी-खी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टँडअप कॉमेडियन पुलकीत मणि या तरुणाने सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. पुलकीतने इन्स्टाग्रामवर एक रील बनवली असून या रीलला तुफान प्रतिसाद मिळत आहे. हजारो युजर्स यावर कमेंट करत असून हजारो लोक या रीलला शेअर करत आहेत. पुलकीतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशी धोरणावर व्यंगात्मक भाष्य करणारी रील बनवली होती. मोदी परदेश दौऱयावर गेल्यानंतर तेथील राजकीय नेत्यांसोबत कसे हसतात, त्यांना कशा मिठय़ा मारतात, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओला तब्बल 16 मिलियनहून अधिक ह्यूज मिळाले. परंतु पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका सहन न झाल्याने सरकारने हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे. यावरही आता आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.