
एका बागेतील विचित्र झाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून अनेकांना प्रश्न पडलाय की, हे नक्की झाड आहे की राक्षस. कारण वारा सुटताच ते अशा काही अनोख्या पद्धतीनं डोलतं की, ते पाहून कोणाच्याही पोटात भीतीचा गोळाच येईल. झाडाच्या फांद्या वाऱयाबरोबर वेडय़ावाकडय़ा डोलतायत. झाड कधी अंगावर पडेल याचा नेम नाही. रात्रीच्या वेळी जर कोणी हे झाड जवळून असे डोलताना पाहिले तरे खरंच भीतीने थरकाप उडेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ‘या झाडाखाली बसून अभ्यास करणारे टॉपर नाही, तर राक्षस बनतील.’ या विचित्र झाडाचा व्हिडीओ @_Dbyanshu73 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.