मोबाईल युजर्स स्पॅम आणि फसव्या कॉलपासून त्रस्त असतात. याविरोधात आता ट्रायने कंबर कसली आहे. फसव्यांना लगाम घालण्यासाठी ट्राय येत्या 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू करणार आहे. त्यानुसार मोबाईल नंबरचा वापर करून टेलिमार्केटिंग किंवा प्रमोशनल कॉल केल्यास तो नंबर दोन वर्षांसाठी ब्लॅकलिस्टेड होईल, असे ट्रायने स्पष्ट केलेय.
नवीन नियमानुसार, तुमच्या मोबाईलवरून फसवे कॉल झाले तर त्याची जबाबदारी संबंधित दूरसंचार कंपनीवर असेल. दूरसंचार कंपन्यांवर कडक नियम लावून मोबाईल युजर्सचे संरक्षण करण्यासाठी ट्रायने हा नवा नियम आणलाय. फसव्या आणि प्रमोशनल कॉलसाठी फसव्या पद्धतीचा वापर हा दूरसंचार नियमांचा भंग आहे, असे ट्रायने स्पष्ट केलेय. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक मजबूत कार्यवाही आराखडा तयार करण्यात आलाय.