मुरुड तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधव शिवसेनेत दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शेकाप पक्षातील कार्यकर्ते व शेकडो आदिवासी बांधवांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने झंझावात सुरू केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, तालुकाप्रमुख राजा केणी यांच्या उपस्थितीत हा९ सोहळा पार पडला.

पोयनाड, ताडवागळे हा भाग शेकापचा बालेकिल्ला आहे. मात्र या भागात शिवसेनेने शेकापला शह देण्यास सुरुवात केली आहे. पोयनाड, ताडवागळे भागातील शेकापचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. तर मुरुड तालुक्यातील शेकडो आदिवासी बांधवांनीही शिवसेने जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे अलिबाग मुरुड मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढत आहे.