पावसाच्या तुफान सरीत चेंबूरमध्ये धावले हजारो धावपटू

यंदा  वाढत्या सहभागासह ‘त्रिधातू मान्सून 10 के  रन’च्या आठव्या आवृत्तीला चेंबूर, मुंबई आणि महाराष्ट्राबाहेरील मॅरेथॉनर्स आणि फिटनेस उत्साही लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या चेंबूरच्या वार्षिक प्रमुख कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 2000  हून अधिक धावपटूंनी रविवारी सकाळच्या पावसाच्या सरी आणि थंडगार वाऱयाचा मारा सहन करत चेंबूरच्या रस्त्यांवर धाव घेतली. असा उदंड प्रतिसाद मिळवून ‘त्रिधातू मान्सून 10 के  रन’ ही शहरातील प्रमुख शर्यंतींपैकी   एक बनली आहे. ‘त्रिधातू मान्सून 10के रन 2022’चे विजेतेपद करण शर्माने 34  मिनिटे 35  सेपंदांत जिंकले. रुतुजा सकपाळने महिला गटात विजेतेपद पटकावले.

यंदा  मर्द आणि पॉप्युलेशन फाऊंडेशन इंडियाच्या सोबतीने ही सायबर गैरवापर संपवण्याच्या प्रचारासाठी रन आयोजित करण्यात आली होती. बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तरने सकाळी 6  वाजता रनला फ्लॅग ऑफ केले आणि सायबर गैरवापर संपवण्याच्या आणि सर्वांसाठी एक सुरक्षित ऑनलाइन जग निर्माण करण्याच्या भावनेने धावपटूंना प्रेरित केले. विजेत्यांना ट्रॉफी आणि धावपटूंना फिनिशर्स मेडल देण्यात आले. धनंजय सांडू (सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, त्रिधातू रिअॅल्टी) यांनी स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आणि मॅरेथॉन यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.