त्रिपुरारी पौर्णिमा – लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत

890

जालना जिल्ह्याचे ग्रामदैवत अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदीर लक्ष लक्ष दिव्याच्या प्रकाशाने नाहुन निघाले. निमित्य होते त्रिपुरारी पौर्णिमेचे. अंबड येथील मत्स्योदरी देवी मंदीर परिसर आणि मंदिराच्या पायऱ्या, दीपमाला, शिखर यावर त्रिपुरारी पौर्णिमे निमित्ताने हजारो दिव्यांची आरास करण्यात येते.

अंबड येथील मत्स्योदरी दीपोत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षापासून हा दीपोत्सव साजरा करत असून या वर्षी ही मंदीर परिसरात हजारो दिवे वज्वलित करण्यात आले होते. या लख लखत्या दिव्यांच्या प्रकाशाने मंदीर परिसर उजलून निघाला होता. ही दिव्यांची नयनरम्य आरास पाहण्यासाठी शहरास जिल्हाभारतील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती या दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदीर परिसर रांगोळ्यानी सुषोभित करण्यात आला होता. तर संपूर्ण दिवे प्रज्वलित झाल्यानंतर मंडळाच्या वतीने आरती करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या