पाथर्डीजवळील करंजी घाटात ट्रक उलटला

407

मुंबईहून परभणीकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला करंजी घाटातील धोकादायक वळणावरील खड्डा चुकवताना अपघात झाला. या अपघातात ट्रक  चालकासह क्लिनर जखमी झाला आहे. मंगळवारी सकाळी हा अपघात झाला आहे.

मुंबईहून डाक पार्सल घेऊन परभणीकडे निघालेला ट्रक मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास करंजीघाट उतरत असताना एका धोकादायक वळणाजवळ पडलेला मोठा खड्डा चुकवताना या मालट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यानेला ट्रक घाटाच्या कडेला असलेल्या  कठड्यावर जाऊन  उलटला. या अपघातामध्ये ट्रकचालक गफूरखान पठाण आणि क्लीनर सगीर सय्यद (दोघे रा. परभणी) हे या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले असून ट्रकचेही  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक संरक्षण कठड्यावर अडकल्याने जीवितहानी टळली आहे. नगर पाथर्डीमार्गे जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर मार्गावरील जांब कौडगाव, मराठवाडी, करंजीघाट, करंजी, देवराई ,तिसगाव , निवडूंगे या ठिकाणी मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे अनेकांचा बळी जात आहे. या महामार्गावरील खड्डे दुरूस्त करावेत अशी मागणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या