अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत शिकणाऱया अनिवासी विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा केली. अमेरिकेत येऊन पदवी घेणाऱया सर्व विद्यार्थ्यांना ऑटोमेटिक ग्रीन कार्ड मिळेल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. ऑटोमेटिक ग्रीन कार्डमुळे प्रतिभावंत हिंदुस्थानी किंवा चिनी विद्यार्थी अमेरिका सोडून जाणार नाहीत. मायदेशी जाऊन अब्जाधीश होण्याऐवजी इथे अमेरिकेत राहूनच अब्जाधीश होतील, असे ट्रम्प म्हणाले.
n ‘ऑल इन’ नावाच्या पॉडकास्टमध्ये जगभरातील प्रतिभावंत व्यक्तींना अमेरिकेत बोलावण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या योजना सांगितल्या. विद्यार्थ्यांना अमेरिकेत राहण्यासाठी ग्रीन कार्ड मिळाले पाहिजे. त्यात ज्युनियर कॉलेजचाही समावेश हवा.