
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला व्हेनेझुएलाचे ऑक्टिंग प्रेसिडेंट म्हणून घोषित केले आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये ट्रम्प यांच्या फोटोसोबत ‘ऑक्टिंग प्रेसिडेंट ऑफ व्हेनेझुएला’ असे लिहिले आहे.
ट्रम्प यांनी टथ सोशलवर यावर टाकलेल्या पोस्टमध्ये जानेवारी 2026 पासून व्हेनेझुएलाचे ऑक्टिंग प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारल्याचे लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने व्हेनेझुएलाविरुद्ध मोठय़ा प्रमाणावर कारवाई केली होती. या कारवाईत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेऊन न्यूयॉर्कला आणण्यात आले. व्हेनेझुएलाचा कारभार अमेरिकाच चालवेल. हे तोपर्यंत चालेल, जोपर्यंत तिथे सुरक्षित सत्तांतर होत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टबाबत व्हाईट हाऊस किंवा अमेरिकेच्या प्रशासनाकडून कोणतेही औपचारिक निवेदन देण्यात आलेले नाही.




























































