
पांढरे केस व्हायला आता वयाचे बंधन राहिले नाही. कोणत्याही वयात मुलांचे किंवा मुलींचे पांढरे केस होत आहेत. केस काळे करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. नारळ तेलात लिंबूचा रस मिसळून केसांवर लावा. काही वेळानंतर केस धुवा. हा उपाय आठवड्यातून एकदा केल्यास पांढरे केस काळे होतात.
कडुनिंबाच्या पानांचा रस केसांवर लावल्यास केस पांढरे होण्यापासून रोखता येतात. मेंदी पावडर पाण्यात मिसळून एक गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून दोन तास ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. केसांना कोणताही शाम्पू लावण्याचे टाळा. काळ्या जिऱ्यांचा वापर करूनही केस काळे होण्यास मदत होते.






























































