हे करून पहा – भजी होतील खमंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 भजी अधिक कुरकुरीत व खमंग करण्यासाठी पिठात दोन ते तीन चमचे तांदळाचे पीठ किंवा रवा मिसळा. तसेच पीठ भिजवताना पाण्याचा वापर कमी करा, कांद्याला मीठ लावून 10 मिनिटे ठेवा.
 भजी तळताना पिठात एक चमचा कडकडीत गरम तेल टाका आणि तेल चांगले उकळलेले असावे. मध्यम आचेवर भजी सोनेरी रंगावर तळावी.