
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील तिर्थ धानोरा येथील ४० वर्षीय तुकाराम पेड यांनी मराठा आरक्षणासाठी रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तहसिल कार्यालयासमोर विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला हलविण्यात आले.


























































