
भारतीय जनता पक्षाला दक्षिणेत मोठा धक्का बसला आहे. तामिळनाडूतील प्रादेशिक पक्ष असलेल्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमने राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एएमएमकेचे प्रमुख टी. टी. व्ही. दिनकरन यांनी बुधवारी याबाबत घोषणा केली. त्यामुळे 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूत नवीन राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता आहे.
अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (AMMK) हा तामिळनाडूतील प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 15 मार्च 2018 रोजी या पक्षाची स्थापना झाली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एएमएमकेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र आता एएमएमकेचे प्रमुख टी. टी. व्ही. दिनकरन यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून डिसेंबरमध्ये नवीन आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
मोदींचा तिसरा कार्यकाळ देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरेल असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आम्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण 2026 च्या विधासभा निवडणुाका लोकसभा निवडणुकीपेक्षा वेगळ्या असून नवीन आघाडीबाबत आम्ही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून डिसेंबसरमध्ये निर्णय जाहीर करू, असे बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिनकरन म्हणाले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे एआयएडीएमके गट एकत्र आलेत, या दाव्यालाही दिनकरन यांनी फेटाळून लावले.
Kattumannarkoil, Tamil Nadu: AMMK General Secretary TTV Dinakaran says, “AMMK is coming out of the NDA Alliance, and we will announce our next course of action by December.”
Source: AMMK/ YouTube pic.twitter.com/xKOLpF3FRq
— ANI (@ANI) September 3, 2025