तुळजाभवानीचे नवरात्र पारंपरिक उत्साहात, मात्र भाविकांना दर्शन बंदी कायम

महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानीचे शारदीय नवरात्र पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात येईल. या काळात संपूर्ण धार्मिक विधी करण्यात येणार आहेत, मात्र भाविकांना दर्शनबंदी कायम ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी सांगितले. नवरात्राच्या अगोदर सर्व पुजारी व मानकऱयांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून जे निगेटिव्ह असतील त्यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.

शारदीय नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी विश्वस्त, पुजाऱयांची बैठक झाली. या बैठकीत मर्यादित संख्येमध्ये तसेच मानकरी व र्धािमक विधीसाठी आवश्यक असणारे प्रतिनिधी यांनाच प्रवेश देऊन शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला. नवरात्रातील सर्व धार्मिक विधी पारंपरिक रितीरिवाजानुसार करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या