तुळजाभवानी मातेचे दर्शन 1 ते 10 ऑगस्ट बंद

महाराष्ट्राची कुलस्वामिनी  तुळजाभवानी मातेचे दर्शन भाविकांसाठी 1 ते 10 ऑगस्ट या दरम्यान दहा दिवस बंद राहणार आहे. मंदिरात सुरू असलेल्या कामामुळे मंदिर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून, या काळात भाविकांना केवळ मुख्य दर्शन घेता येणार आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरातील सुरू असलेल्या जीर्णेद्धाराच्या कामामुळे धर्मदर्शन आणि पेडदर्शन 1 ते 10 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर संस्थानच्या स्वनिधीतून 58 कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. या कामामध्ये मंदिरातील सध्याची बांधकामे काढून मंदिर पुरातन रूपात आणले जाणार आहे. ही सर्व कामे पुरातत्व विभागाच्या देखरेखीत करण्यात येत आहेत.