तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींना कश्मीरची उचकी! संयुक्त राष्ट्रात कश्मीर प्रश्नाचा उल्लेख

पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या तुर्कस्थानला पुन्हा कश्मीरची उचकी लागली. तुर्कस्थानचे राष्ट्रपती रजब तय्यब आर्देयान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करताना जाणीवपूर्वक जम्मू-कश्मीरचा उल्लेख केला. हा प्रश्न संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून सोडविण्यात यावा, असा फुकटचा सल्लाही त्यांनी दिला.

पाकिस्तान आणि तुर्कस्थानची मैत्री जगजाहीर आहे. पाकिस्तानच्या प्रेमाखातर तुर्कस्थानने यापूर्वीही कश्मीरप्रश्नात नाक खुपसले आहे. गेल्यावर्षीही राष्ट्रपती आर्देयान यांनी जम्मू-कश्मीरचा वादग्रस्त उल्लेख केला होता. त्यावर हिंदुस्थानने तीव्र आक्षेप घेत तुर्कीच्या या भूमिकेमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर विपरित परिणाम होतील, असा इशारा दिला होता.

मात्र, मंगळवारी संयुक्त राष्ट्रात बोलताना राष्ट्रपती आर्देयान यांनी पुन्हा आगळिक करून कश्मीरचा उल्लेख केला. 74 वर्षांपासून आम्ही कश्मीरप्रश्न चर्चेच्या माध्यमातून तसेच संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने सुटेल अशी अपेक्षा बाळगून आहोत, अशी मखलाशी आर्देयान यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या