कोकणवासीयांना खूषखबर! तुतारी एक्सप्रेसला आणखी चार डबे जोडणार

933

कोकणवासीयांना कोकण रेल्वेने खूषखबर दिली आहे. दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस गाडीला आणखी चार डबे जोडले जाणार आहेत.एक थ्री टियर एसी, एक स्लीपर आणि दोन जनरल डबे अधिक जोडण्यात येणार आहेत. 11 नोव्हेंबर पासून हे चार जादा डबे कायमस्वरुपी जोडले जातील.

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. ही गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने तुतारी एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवली आहे. 11 नोव्हेंबर पासून हे चार डब्बे जोडले जाणार आहेत. पूर्वी 15 डब्यांची तुतारी एक्सप्रेस आता 19 डब्यांची होणार आहे. त्यामध्ये एक टू टियर एसी, दोन त्री टियर एसी, 8 स्लीपर कोच, 6 जनरल डबे आणि 2 एसएलआरचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या