
टीव्ही अभिनेता रोहित चंदेल याला अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आणि तिचा पाठलाग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रोहितविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. दहिसर येथील त्याच्या घरातून पोलिसांनी अटक करून त्याला विशेष पोक्सो न्यायालयात हजर करण्यात आले.



























































