काम करण्यास नकार दिल्याने त्याने माझ्यासोबत अश्लील..! अभिनेत्रीने इंडस्ट्रीची काळी बाजू केली उघड

10740

टीव्ही आणि चित्रपट इंडस्ट्रीमध्ये वरकरणी जेवढी चकाचक दिसते तेवढी काळी बाजूही त्याला असते. अभिनेते, अभिनेत्री यांनी वेळोवेळी ही बाजू उघडही केली आहे. आता यात एक नाव आणखी जोडले गेले आहे. टीव्ही अभिनेत्री छवी पांडे हिने सोशल मीडियावर एक धक्कादायक घटना शेअर केली आहे.

‘एक बुंद इश्क’ छवी पांडे हिला काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपद्वारे एकाने कामासाठी संपर्क साधला होता. त्याने छवीला जाहिरातीत काम करण्याबाबत विचारणा केली. अभिनेत्रीने नकार दिल्याने त्या व्यक्तीने मला शिवीगाळ चालू केली, असे छवी पांडे हिने सांगितले. इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘मला काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधला. एका उत्पादनाच्या जाहिरातीत की त्याच्यासोबत काम करावी अशी त्याची इच्छा होती. मात्र मला त्यावेळी काहीतरी गडबड वाटली आणि मी नम्रपणे त्याला नकार दिला. यानंतर त्याने माझ्यासोबत गैरवर्तवणूक सुरू केली, असे छवीने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

त्याने मला शिवीगाळ सुरू केली. माझ्यासोबत अश्लील पद्धतीने बोलू लागला. मात्र त्याने नंतर मेसेज डिलीट केले, असे छवी म्हणाली. यासोबतच तिने इंडस्ट्रीमध्ये नुकतेच पाऊल ठेवलेल्या कलाकारांना सावधान केले. अशी लोक फक्त तुमचा वापर करून आपले काम करून घेतात, असेही ती म्हणाली. तसेच यावेळी छवीने माझ्या मनाविरुद्ध कोणी मला वागण्यास भाग पाडू शकत नाही, असेही म्हटले.

img_20200531_162312

आपली प्रतिक्रिया द्या