आणखी दीड महिने मालिकांचे शूटिंग बंद राहणार

1415

टिव्हीवरील मालिका या घरातील मंडळीच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग बनल्या आहेत.c. अनेक जुन्या मालिका देखील परत दाखवल्या जात आहेत.

लॉकडाऊनमुळे लोकं घरात असताना त्यांच्या नियमित मालिका बंद झाल्यामुळे अनेकांचा विरंगुळा बंद झाला आहे. मार्च 18 पर्यंत मालिकांचे शूटिंग सुरू होते. मात्र तेव्हापासून शूटिंगपूर्णपणे बंद झाले असून आता हे शूटिंग जून महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे समजते. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयी या संस्थेचे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. मात्र शूटिंग सुरू करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसला या संस्थेकडून काही नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.

शूटिंगच्या ठिकाणी मास्क वापरणे व सॅनिटायझर असणे बंधनकारक केले आहे. तसेच शूटिंगच्या ठिकाणी एक निरिक्षक नेमावा लगाणार असून तो या सगळ्यावर लक्ष ठेवून राहिल. जर शूटिंगदरम्यान कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली व त्या कर्मचाऱ्याचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत करावी लागेल. तसेच प्रोड्युसरला शिफ्टमध्ये कामं करून घ्यावी लागणार आहेत. शूटिंगच्या ठिकाणी अॅम्ब्युलन्स ठेवणे बंधनकारक असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या