सोन्यापेक्षा महाग गिफ्ट! अक्षय कुमारने करिनाऐवजी ट्विंकलचे कान टोचले

1380

बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना ही आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखली जाते. ट्विंकलने अनेकदा चालू घडामोडींवर सोशल मीडियाद्वारे भूमिका मांडत असते. आताही तिने सद्य परिस्थितीशी मिळती-जुळती एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ट्विकलने इन्स्टाग्रामवर कांद्याचे कानातले शेअर केले आहेत. विशेष म्हणजे कांद्याचे हे कानातले अक्षय कुमार तिच्यासाठी घेऊन आला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ट्विंकलच्या हातामध्ये कांद्याचे कानातले दिसतात. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, कपिल शर्माच्या शोमध्ये ‘गुड न्यूज’ सिनेमाच्या प्रमोशनवेळी करिना कपूरला हे कानातले देण्यात आले होते. पण करिनाला ते आवडले नाहीत म्हणून अक्षयने हे माझ्यासाठी आणले.

‘माझा पार्टनर द कपिल शर्मा शोमध्ये परफॉर्म करून परतला आणि मला म्हणाला की, हे कानातले मी करिनाला दाखवले पण मला वाटतं की तिला फारसे आवडले नाहीत. पण मला माहीत होतं की तुला हे कानातले आवडतील. त्यामुळे मी हे तुझ्यासाठी आणले. कधी कधी गोष्टी फार लहान असतात पण तरीही त्या तुम्हाला भावतात, असे ट्विंकलने पोस्टमध्ये नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या