
एलन मस्क यांनी ट्विटरचा कारोबार हातात घेतल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले. देशात आतापर्यंत ब्लू टिक यूजर्सकडून कोणत्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नव्हता. मात्र आता ट्विटर ब्लू टिक यूजर्सकडून पैसे आकारणार आहे. ट्विटरवब्लू टिकसाठी ग्राहकांकडून 650 रुपये प्रतिमहिना चार्ज करेल. तर अॅण्ड्रॉईड आणि आईओएस मोबाईल डिवाइसवर 900 रुपये आकारेल. ट्विटर ब्लयू टिक आता हिंदुस्थान, इंडोनेशिया आणि ब्राझिलमध्ये वाढवण्यात आले आहे.
ट्विटर भारतात दरवर्षी 6800 रुपयांच्या सवलतीचा वार्षिक प्लॅन देत आहे. ज्याचा अंदाजे 566.67 प्रति महिना होतात. जर युजरने मासिक सबस्क्रिप्शन न घेता जर वार्षिक सबस्क्रिप्शन घेतले तर ते स्वस्त पडेल. हिंदुस्थानात लॉन्चसोबत ट्विटर ब्ल्यू आता यूएस, कॅनडा, जापान, यूके आणि सौदी अरेबियासब 15 बाजारपेठेंमध्ये उपलब्ध आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपली ब्लू सर्व्हिस सबस्क्रिप्शन सेवा आणखी सहा देशांमध्ये विस्तारित केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, ट्विटरने पडताळणीसह आपली ब्लू सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा सुरू केली, ज्याची किंमत जागतिक स्तरावर अॅड्रॉईड वापरकर्त्यांसाठी $8 आणि आयफोन मालकांसाठी $11 आहे.
ट्विटरने आता यूएसमधील ब्लू सदस्यांना 4,000 शब्दांपर्यंतचे ट्विट तयार करण्याची परवानगी दिली आहे. ट्विटर ब्लू सदस्यांना त्यांच्या होम टाइमलाइनमध्ये 50 टक्के कमी जाहिराती देखील दिसतील. ब्लू टिक्स सोबत, ट्विटर ब्लू फिचर ग्राहकांना त्यांचा ट्विटर अनुभव वाढवण्याचा मार्ग देते, ज्यामध्ये कस्टम अॅप चिन्ह, नेव्हिगेशन, शीर्षलेख, पूर्ववत ट्विट्स, लांब व्हिडिओ अपलोड आणि बरेच काही समाविष्ट आहे. ट्विटर ने व्यवसायांना गोल्ड वॅज टिकवून ठेवण्यासाठी दरमहा $1,000 भरण्यास सांगितले आहे आणि जे ब्रँड आणि संस्था पैसे देत नाहीत ते चेकमार्क गमावतील.