अफवा पसरवणाऱ्या पाकड्यांची 200 अकाऊंटस् ट्विटरने बंद केली

201

हिंदुस्थानने जम्मू- कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करून जम्मू-कश्मीरला केंद्रशासित घोषित केल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. आता कश्मीरातील परिस्थितीबाबत अफवा पसरवणे, जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये सोशल साइटस्वर टाकून कश्मीर खोऱयातील नागरिकांत फूट पाडण्याचे धोरण पाकिस्तानी नेटकऱयांनी सुरू ठेवले होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ट्विटरने 200 पाकिस्तानींची खाती बंद केल्याने पाकिस्तान प्रचंड सैरभैर झाला आहे. पाकिस्तान दूरसंचार विभागाने (पीटीए) ट्विटरला यासंदर्भात जाब विचारणारे पत्र पाठवले आहे.

– कश्मीरातील वातावरण बिघडविण्यासाठी सोशल साइटस्वर अफवा पसरवणे, हिंदुस्थानविरोधात खोटय़ा बातम्या पसरवून कश्मीरप्रकरणी जगाची सहानुभूती मिळवण्याची पाकडय़ांची धडपड सुरू आहे. त्यातूनच ट्विटरसह अन्य सोशल साइटस्वर हिंदुस्थानविरोधात खोटय़ा बातम्या पेरण्याचे काम पाकिस्तानचे नेटकरी करीत आहेत. त्यांना वेसण घालण्यासाठीच ट्विटरने तब्बल 200 पाकिस्तानी नेटकऱयांची खाती बंद करीत पाकडय़ांना मोठा दणका दिला आहे.

आमचे धोरण जगभरातील युजर्ससाठी सारखेच – ट्विटर
आम्ही जगभरातील कोणत्याही युजर्सवर अन्याय अथवा दुजाभावाचे धोरण ठेवत नाही. मात्र समाजविघातक अथवा देशविघातक अफवा रोखणे हे आम्ही बनवलेल्या नियम आणि निकषांचाच भाग आहे. त्याचे उल्लंघन करणारा कुणीही असो त्याला आम्ही रोखणारच असे ट्विटर प्रशासनाने पाकिस्तानला बजावले आहे.

कश्मीर हा हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा – फ्रान्स
गेली अनेक वर्षे वादात सापडलेला कश्मीर मुद्दा ही हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय समस्या आहे. ती उभय देशांनी चर्चेतून सोडवायला हवी. त्यासाठी तणाव निर्माण होईल अशी कृती त्यांनी करू नये,अशी प्रतिक्रिया फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन एस ले ड्रियांस यांनी दिली आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यासोबतच्या चर्चेप्रसंगी ड्रियांस बोलत होते.

जम्मू, श्रीनगरच्या महापौरांना आता राज्यमंत्रीपदाचा दर्जा

कश्मीर राज्य प्रशासनाने जम्मू आणि श्रीनगरच्या महापौरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अतिरिक्त सचिव सुभाष छिब्बर यांनी प्रोटोकॉल आणि सुविधा विभागाला या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे श्रीनगरचे महापौर व पीपल्स कॉन्फरन्सचे नेते जुनेद मट्टू आणि जम्मूचे महापौर, भाजप नेते चंदर मोहन गुप्ता यांना आता राज्यमंत्रीपदाचे अधिकार राज्य प्रशासनाकडून मिळाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या