बैल घेऊन कत्तलखान्यात निघालेला ट्रक पोलिसांनी पकडला

785

चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पेट्रोलिंग करत असताना 16 बैल कत्तलखान्यात घेऊन जाणारा एक आयशर ट्रक पोलिसांनी पकडला.

गुरे कत्तलखान्यात नेली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त सुरू केली होती. त्याचवेळी त्यांना हा आयशर ट्रक सापडला. चालक दाऊद मेहबूब दाफेदार यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये बांधून ठेवलेले बैल पाहिल्यावर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता बाबू शेख याच्या सांगण्यावरून हे बैल खेड येथील संतोष कदम याच्याकडून घेऊन कत्तलखान्यात नेत असल्याचे सांगितले.एकूण 13 लाख 9 हजार रुपये किंमतीचे बैल या आयशर ट्रकमध्ये होते. हे बैल तो कराड येथील कत्तलखान्यात घेऊन निघाला होता. बैल घेऊन जाणाऱ्या आरोपी दाऊद मेहबूब दफेदार व बाबू शेख यांना सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या