पवना धरणात बुडून अभ्युदय नगरातील दोन तरुणांचा मृत्यू

521
drowned

पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 15) दुपारी एकच्या सुमारास घडली.

अमेय दिलीप रहाटे  (25) आणि तेजस रवी पांगम  (22, दोघे रा. काळाचौकी, अभ्युदयनगर, मुंबई) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. रविवारी  पवना धरण परिसरात अमेय व तेजस हे अन्य दोन मित्रांसोबत फिरायला आले होते. दुपारी एकच्या सुमारास ते सर्वजण धरणात पोहण्याकरिता उतरले. अमय आणि तेजसला पोहता येत नव्हते त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. मित्रांनी आरडाओरडा केल्याने धरण परिसरात फिरायला आलेल्या इतर पर्यटकांनी अमय आणि तेजस यांना त्वरित पाण्याबाहेर काढले, मात्र उपचारापूर्कीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार सुनील बाबर अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या