संघाचे ‘हमारे दो’!

949

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. मुरादाबाद दौऱयावर असलेल्या सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी ‘हम दो हमारे दो’ अशी यापुढील संघाची भूमिका असल्याचे संकेत दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ‘कुटुंब नियोजन हीदेखील देशभक्ती आहे’, असे भावनिक आवाहन करत लोकसंख्या नियंत्रणाची भूमिका मांडली होती. त्यानंतर आता मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणाशी संबंधित कायद्याला पाठिंबा देण्याची भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संघाच्या जिज्ञासा समाधान सत्रात बोलताना सरसंघसंचालक भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या विषयात दोन मुलांबाबतच्या कायद्याला आरएसएसचा पाठिंबा असेल; मात्र यावर सरकारने निर्णय घ्यायला हका, असे मत व्यक्त केले. अयोध्येतील राममंदिर प्रकरणात संघाची भूमिका केवळ ट्रस्ट स्थापन करण्यापर्यंतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्दय़ांपासून मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही. उलट या मुद्द्यांबाबत समाजात जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही भागवत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या