
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी 2 नविन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोना बाधितांची संख्या 216 झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 154 झाली असून सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाचे 56 एक्टिव्ह रुग्ण आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 2 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. हे दोन्ही रुग्ण सावंतवाड़ी तालुक्यातील आरोंदा गावचे आहेत. हे दोन्ही रुग्ण मुंबईहुन जिल्ह्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची एकूण संख्या 216 झाली आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांची संख्या 154 एवढी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ 56 रुग्ण अक्टिव्ह आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण 3 हजार 845 पाठवले होते. त्यापैकी 3 हजार 772 अहवाल प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत 216 पॉजिटीव्ह आलेले आढळले आहेत.तर 3 हजार 556 नमुने निगेटिव्ह आढळले आहेत. 4 हजार 82 लोकांना संस्थात्मक अलगीकरणातील करण्यात आली आहे. 16 हजार 898 लोकांना शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील करण्यात आले आहे.




























































