Photo – दुतोंडी सापाने एकाचवेळी दोन उंदरांचा पाडला फडशा

सापाचे नाव ऐकले तरी अनेकांची भीतीने गाळण उडते. अशात जर दोन तोंड असलेला साप समोर आला तर विचारूच नका.

snake-1

सध्या अशाच एका दुतोंड्या सापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अमेरिकेतील कंटेंट क्रिएटर ब्रायन ब्राजिक याने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

snake-2

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक दुतोंड्या साप दोन्ही तोंडाने दोन उंदरांचा फडशा पाडताना दिसतोय.

snake-4

हा व्हिडीओ शेअर करताना बार्जिक याने या धाडसी घटनेचा आनंद घ्या. आम्ही पुन्हा येऊ, तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आमच्याकडे खूप काही आहे, असे कॅप्शन दिले आहे.

snake3

बार्जिक याचे सोशल मीडियावर 6 लाख फॉलोअर्स आहे. त्याने शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

snake-5

दरम्यान, हिंदुस्थानमधील पश्चिंम बंगाल राज्यातील मिदनापूर शहराजवळील एकरुखी गावातही दुतोंड्या साप आढळला होता. पौराणिक मान्यतांमुळे येथील स्थानिकांनी वनविभागाकडे या सापाला सोपवण्यास नकार दिला होता.

आपली प्रतिक्रिया द्या